Tuesday, May 7, 2024

/

महाराष्ट्रातही काळा दिन पाळा -युवा समितीने लिहिली पत्रे

 belgaum

1 नोव्हेंबर काळा दिन सीमा भागासह महाराष्ट्रातही पाळला जावा जेणेकरून सीमा प्रश्न सोडवणूकिला अधिक चालना मिळेल अशा आशयाचे विनंती पत्र बेळगांवच्या युवा समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री व मान्यवर अशा एकूण 23 जणांना धाडले आहे.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसह कर्नाटक सरकारचे मराठी विरोधी धोरण आणि दडपशाहीच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येणार आहे. काळा दिनानिमित्त कडकडीत हरताळ आणि मूक निषेध सायकलफेरी हे उपक्रम महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे राबवले जातात.

तथापि यावेळी म. ए. समितीचा एक भाग असणाऱ्या युवा समितीने नवा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह येथील महत्त्वाचे राजकीय नेते आणि नामवंत व्यक्तींना पत्रं धाडून सीमा भागाप्रमाणे महाराष्ट्रात देखील काळा दिन पाळावा, अशी विनंती करण्यात आली आहे

 belgaum
Letters yuva samiti
Letters yuva samiti

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नितेश राणे, मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, नीलमताई गो-हे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य उद्धवजी ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सुभाष देसाई, भाई जगताप आदी 23 मान्यवरांना युवा समिती बेळगांवने पत्र धाडून महाराष्ट्रात देखील 1 नोव्हेंबर काळा दिन पाळावा, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये पडलेली फुट सांधून पुन्हा एकजूट निर्माण करण्यासाठी आपण चर्चेला तयार असल्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सुचित केले असल्याचे समजते. तेंव्हा समितीच्या सर्व नेत्यांनी गटातटाचे राजकारण विसरून दळवी यांना प्रतिसाद देऊन चर्चेद्वारे एकमेकातील गैरसमज दूर करावेत आणि समितीची संघटना पुन्हा एकसंध बळकट करावी, असे मत युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.