बेळगावच्या सीसीआयबी पथकाच्या वतीने कोल्हापूर सर्कल येथील इंद्र छाया कॉम्प्लेक्समधील ‘द स्मोक शॉप’ येथे धाड घालून हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मादक वस्तूंसहित तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ८ किलो ६८५ ग्राम वजनाची मादक द्रव्ये जप्त केली आहेत.
बेळगावचे पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्या नेतृत्वाखाली डीसीपी विक्रम आमटे, डीसीपी चंद्रशेखर नीलगार, आणि एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर संजीव कांबळे आणि सीसीआयबी पथकाने ही कारवाई केली आहे.
सलीम मुंडरपाळी अब्दुल्ला (रा. कासरगोड, केरळ, सध्या राहणार : सुभाष नगर, बेळगाव), महंमदअली इब्राहिम (रा. कासरगोड, केरळ, सध्या राहणार सुभाष नगर) आणि अबूबक्र मुप्पीद मेहमूद अड्डतोबे (रा. कासरगोड, केरळ, सध्या राहणार सुभाष नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.
हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ८ किलो ६८५ ग्राम वजनाची १९३ मादक द्रव्यांची पाकिटे तसेच रोख १४०० रुपये जप्त करण्यात आली असून बेळगाव सीईएन पोलीस स्थानकात हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.