Saturday, April 27, 2024

/

जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने ‘त्या’ घटनेविरोधात भव्य मोर्चा

 belgaum

उत्तरप्रदेशमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह परस्पर जाळण्यात आला, या घटनेच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली असून बेळगावमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्त आज बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

यादरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित असल्याचा आरोप केला. तसेच उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपा सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

 belgaum

या निवेदनात उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अपयशी ठरले असून भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. तसेच उत्तर प्रदेश येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी, त्वरित आणि कठोर पावले उचलण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

यावेळी ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री माळगी, पक्षप्रवक्ते विनय नावलगट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.