देशातील युवा वर्गाला तंदुरुस्ती व निरोगीपणाच्या मार्गावर नेण्यासाठी कोब्रा स्कुलच्या वतीने ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम राबविण्यात येतो.
भारतातील युवावर्गाच्या स्वास्थ्यासाठी ही अनोखी संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सीआरपीएफ ने ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत देशभरात ‘मेगा रन’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कोब्रा स्कुल ऑफ जंगल वॉरफेअर अँड टॅक्टिकस ने हा उपक्रम १ ऑकटोबर रोजी बेळगावमधील तोरली गावातून निवृत्त ब्रिगेडियर आणि प्राचार्य एस. के. लामा यांच्यासह २०० कमांडोंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात आला.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोब्रा स्कुल ऑफ जंगल वॉरफेअर अँड टॅक्टिकस आणि सीआरपीएफ च्या बेळगाव शाखेच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी चार दिवसीय रिले मॅरेथॉन आयोजित केली होती.
यामध्ये १२ कमांडोनी सहभाग दर्शविला. त्यात संदीप शर्मा यांच्या पुढाकारातून ५०० किलोमीटर हुन अधिक अंतर या चार दिवसात कापले गेले. या पथकाने ४ दिवसात या रॅलीच्या अंतर्गत हे अंतर कापून बंगळूर गाठून सीआरपीएफच्या वतीने आयोजित केलेल्या मेगा रन रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीसाठी नागरिक, उत्साही खेळाडूंनी पाठिंबा दर्शविला होता. या रॅलीच्या माध्यमातून तंदुरुस्त राहण्याचा संदेश जनतेला देण्यात आला.