राज्य हवामान खात्याने बेळगावात आगामी काही तासांत भरपूर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून जिल्हाधिकारी यांना सतर्क रहाण्याचा अलर्ट दिला आहे.
पॅलेस रोड बंगळुरू येथील हवामान खात्याच्या कार्यालयाने आगामी तीन तासात विजेच्या गडगडाट सह मूसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटकातील बेळगाव कारवार गदग धारवाड विजापूर आणि चित्रदुर्ग जिल्ह्यात हा अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी सकाळ पासूनच बेळगाव शहर परिसरात ढगाळ वातावरण होते बेळगावकर जनतेने ऊन पाऊस आणि धुक अशी तिन्ही हवामान अनुभव एकाच दिवशी अनुभवले आहेत.
रविवारी हुक्केरी संकेश्वर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या शहरात कार गल्लीतन वाहून जाण्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बेळगावात रात्री 8 च्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले आहे