खराब हवामानाचा फटका केवळ शेतकरी वर्ग किंवा सामान्य जनतेला नव्हे तर बेळगाव येथील सांबरा विमान तळाच्या प्रवाश्यांना देखील बसला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बेळगाव जिल्ह्यात वातावरणात कमालीचा बदल झाला असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
खराब हवामान असल्याने सोमवारी सांबरा विमान तळावरून तीन विमान लँड न होता परत गेली आहेत.सांबरा विमान तळावरून हैद्राबाद तिरुपती आणि बंगळुरू बेळगाव अशी तीन विमान न खराब हवामानाचा फटका बसल्याने परत गेली होती.
सकाळी 8:50 वाजता स्पाईस जेटचे बंगळुरू बेळगाव, 9:30 वाजता तिरुपती बेळगाव हे ट्रू जेटचे विमान तर याच वेळेत हैद्राबाद बेळगाव इंडिगो चे विमान अशी तीन विमान लँडिंग न होता परत गेली पुन्हा वापस येऊन सदर विमान हुबळी विमान तळावर लँडिंग झाली होती.त्यामुळे खराब हवामानाचा फटका बेळगाव हुन ये जा करणाऱ्या विमान प्रवाश्यांना देखील बसला आहे.