Monday, November 18, 2024

/

मनपाच्या पथकावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न

 belgaum

महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र बुधवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर चाकूहल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे यापुढे कशाप्रकारे अतिक्रमण हटवावे यासाठी महानगरपालिका विवंचनेत आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजली आहे. सीबीटी कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. एका व्यवसाय करणाऱ्याने चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांना बोलावून यावर पडदा टाकण्यात आला. कॉम्प्लेक्स समोरील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याने महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथका वर चाकू हल्ला केल्याने पथकही बिथरले. त्यानंतर स्वतःच्या कुटुंबीयांसह त्याने विष प्राशन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे एकच खळबळ माजली.

या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महानगरपालिकेतील अतिक्रमण निर्मूलन विभागाने माघार घेतली. यासंबंधी महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के एच यांच्याकडे लेखी तक्रार देण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला आहे. सीबीटी कॉम्प्लेक्स समोरील एक अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या समीर नामक व्यक्तीने हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रवेशद्वाराजवळच हात गाडी थांबून ऑम्लेट-पाव विक्रीचा व्यवसाय तो करत होता. महानगरपालिकेचा परवाना न घेता त्याने अनधिकृतपणे आपला व्यवसाय थाटला होता. ज्यावेळी महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक ते हटवण्यासाठी गेले त्यावेळी त्याने मोठा गोंधळ माजवला. यासंबंधी मार्केट विभागाकडून त्याला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचे गांभीर्य घेतले नाही. त्यानंतर ज्यावेळी अतिक्रमण विभाग घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. समीरला तेथून गाडी हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी उद्धट उत्तरे आणि मनमानी कारभार करून महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांवरच चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अर्वाच्य शिवीगाळ करत त्यांच्यावर तो धावून गेला.

हा प्रकरण अंगलट येणार असे समजताच त्याने विष प्रशासनाची धमकी दिली. महानगर पालिकेच्या पथकाने तिथून माघार घेतली. हा सारा प्रकार अनेकांना धक्का देणारा ठरला. सध्यातरी महानगरपालिकेने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.