बेळगाव चोर्ला महामार्गावरील बहाद्दरवाडी क्रॉस येथे शनिवारी रात्री बाराच्या सुमारास मार्गावर थांबलेल्या ट्रक ला मागून दुचाकीची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात टिळकवाडी येथील केतन नाईक वय 27 हा युवक जागीच ठार झाला.
मयत केतन हा एका कंपनीत कामाला होता. त्या कामानिमीत्त किणये येथे जात असताना बहाद्दरवाडी क्रॉस जवळील मराठा मंडळ कॉलेज समोर एका थांबलेल्या अवजड ट्रक ला केतन याच्या दुचाकीचा जोराची धडक बसली त्यात त्याच्या डोकीला मार बसून जागीच ठार झाला.
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना हि घटना दिसताच बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.