२१ सप्टेंबरपासून राज्यात शाळा सुरु होणार आहेत, परंतु राज्यभरात विद्यार्थ्यांचे कोणतेही वर्ग होणार नसल्याची माहिती कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी आज दिली आहे.
केंद्राची पुढील सूचना येईपर्यंत कोणतेही वर्ग घेण्यात येणार नाहीत, मात्र पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ३० सप्टेंबर पर्यंत सुरु ठेवले जातील. प्रवेश प्रक्रियेदरम्यान एखाद्या पालकांना जर अडचण येत असेल, तर त्यांनी ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांशी संप्रर्क साधावा, अशी माहिती त्यांनी दिली.
शाळा सुरु करण्याबाबत अनेक विद्यार्थी विचारत आहेत. परंतु अनेक पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची भीती वाटत आहे. या अनुषंगाने सर्व खबरदारी आणि उपाययोजना राबवूनच शाळा सुरु करण्यात येतील. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या मुख्यमंत्री बदलण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, कर्नाटकचे मुख्यमनातरी बदलण्याचा पक्षाचा कोणताही विचार नसून, बी. एस. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्रीपदी असतील. मुख्यमंत्री बदलण्याबाबत प्रसारमाध्यमांनी केवळ अफवा पसरविल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.