Thursday, May 2, 2024

/

इथं उभारा बाबासाहेबांचा पुतळा

 belgaum

कॅम्प परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणी- कॅम्प परिसरात संचयन बिल्डिंग समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी आज कल्लेहोळ येथील जय भीम बहुजन युवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

बेळगावमध्ये अनेक चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येत आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला नाही.

त्यामुळे सर्व ठिकाणी बसविण्यात येत असलेल्या पुतळ्यांप्रमाणेच बाबासाहेबांचा पुतळा देखील या चौकात बसविण्यात यावा, यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

 belgaum

यावेळी जय भीम बहुजन युवा संघाचे अध्यक्ष यल्लाप्पा कांबळे, उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे, सेक्रेटरी शंकर कांबळे, लक्ष्मण कांबळे, महेशकुमार कांबळे, देवप्पा कांबळे, फकीराप्पा तलवार, प्रवीण देवरमणी, नंदू कांबळे, मल्लेश कांबळे, यल्लापा कांबळे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.