पिरनवाडी येथे संगोळी रायान्ना पुतळा बसविल्यानंतर त्या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असेच राहील असा तोडगा पोलीस अधिकाऱ्याने काढला आणि हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर गुरुवारी त्या चौकाचे नामकरण सोहळा पार पडला आहे.
त्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव यापूर्वी पण होतेच मात्र वादामुळे तोडगा काढावा लागला होता आता या चौकाचे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
करवे अध्यक्ष नारायण गौडा हा बेळगावात येऊन आपल्या अकलेचे तारे तोडले होते. मात्र येथील परिस्थितीचा आढावा घेत आणि मराठी भाषिक यांची मागणी मान्य करत पोलिसांनी या चौकाचे नामकरण करण्यास परवानगी दिली आणि अखेर त्या चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असेच ठेवण्यात आल्याने मराठी भाषेतून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. पिरणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाचा फलक बसविण्यासाठी बरेच ग्रामस्थ जमले होते.
सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. गेल्या आठवड्यात पिरनवाडी येथील चौकात क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसण्यावरून तणाव निर्माण झाला होता. मात्र यावर तोडगा काढून हा वाद मिटविण्यात आला आणि पुतळा संगोळी रायान्ना यांचा असला तरी त्या चौकाचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहील असे ठरविण्यात आले. त्यामुळे गुरुवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फलकांवर झळकत असलेला भगवा ध्वज हटवा असे पोलिसांचे म्हणणे होते मात्र शिवप्रेमींनी तो ध्वज काढला नाही.सकाळो ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विधिवत पूजन केले नाक्यावरतील तो परिसर स्वच्छ करून जे सी बी ने खड्डा मारून फलक बसवला यावेळी फलक पूजन झाले त्यावेळी शिकरायांचा जयघोष झाला.