गेल्या ६ महिन्यांपासून हाती घेण्यात आलेल्या कंग्राळी रस्त्याचे कामकाज अजूनही पूर्णत्वास गेले नाही.. याबाबत सातत्याने नागरिकांकडून संबंधित लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
अनेक लोक प्रतिनिधी या रस्त्यावरून मार्गक्रमण करतात मात्र अद्याप या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या रस्त्याची अनेकवेळा अनेक अधिकारी येऊन या रस्त्याची पाहणी करून गेले आहेत. परंतु आजपर्यंत कोणीही या रस्त्याचे कामकाज पूर्ण करण्याबाबत गांभीर्याने लक्ष पुरविले नाही.
कोरोनामुळे एपीएमसीमध्ये आधीच उदासीनता दिसून येत आहे. परंतु सध्या ऐन हंगाम असून एपीएमसीमध्ये शेतकरी वर्गाची तसेच व्यापारी आणि खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे. शिवाय या रस्त्यावरून २०-२२ गावाची वाहतूक असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मुहूर्त कधी साधता येणार याकडे मात्र आता साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या रस्त्याचे कामकाज वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार हे नक्की!