कॅम्प मध्ये गांजा विकणारे दोघे अटकेतकॅम्प भागात गांजा विकणाऱ्या दोघांना धाड टाकून कॅम्प पोलिसांनी त्यांचा जवळील 760 ग्राम गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष उर्फ़ बाबू सुनील वर्मा वय 22 रा. कॅम्प बेळगाव
मयूर सुभाष राऊत वय 25 रा.महाद्वार रोड बेळगाव अशी गांजा विकणाऱ्या दोघांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त त्यागराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डी संतोष कुमार यांनी कारवाई करत आरोपीं कडून 760 ग्राम गांजा जप्त केला आहे.
कॅम्प पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.