समाजातील गरजूंसाठी सतत अग्रेसर असणाऱ्या हेल्प फॉर नीडीच्या वतीने आज मच्छे येथील इंडियन कराटे क्लब येथे सॅनिटायझेशन करण्यात आले.
मच्छे येथे महिलांसाठी मोफत विशेष कराटे क्लास आयोजित केले जातात. इंडियन कराटे क्लबच्या वतीने हे क्लास मच्छे येथील मंगलकार्यालयात घेतले जातात. लॉकडाऊनमुळे अनेक क्लास बंद होते. यामुळे हे क्लासेसही आजपर्यंत बंदच होते.
जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणचे सॅनिटायझेशन करण्यात येते. गेले ६-७ महिने हे कार्यालय बंद होते.
त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू आता सर्व क्लासेस सुरु होत आहेत. गेल्या ६-७ महिन्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण न झाल्यामुळे अनेक शिक्षक अडचणीत सापडले आहेत.
महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालविणाऱ्या इंडियन कराटे क्लब च्या प्रशिक्षकांची सॅनिटायझेशनची फवारणी करण्याची सध्या परिस्थिती नव्हती. यामुळे हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अंगोळकर यांनी पुढाकार घेऊन या मंगलकार्यालयात मोफत सॅनिटायझेशन केले.
या उपक्रमात सुरेंद्र अंगोळकर यांच्यासह हेल्प फॉर निधीचे दीपक पांडे, प्रीती बसवराज, माधुरी जाधव उपस्थित होते.