बेळगाव विमानतळावरून विविध ठिकाणी उड्डाणांसाठी मागणी होत होती. त्यामध्ये बेळगाव ते चेन्नई साठी थेट विमानाचीही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
या मागणीचा विचार करून प्रवाशांसाठी ‘ट्रू-जेट’ या कंपनीने बेळगाव ते चेन्नई व्हाया म्हैसूर हवाई वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हि विमानसेवा १ ऑक्टोबर रोजी प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहे. म्हैसूर येथे कडाप्पा या विमानाचीही सोय आहे. परंतु येथील ले-ओव्हर चा अवधी ३ तासांहून अधिक आहे.
बेळगावमधून १ ऑकटोबर पासून बेळगाव ते हैद्राबाद, म्हैसूर, चेन्नई, काडापा, विजयवाडा (काडापा), राजमुंद्री (व्हाया हैद्राबाद) याठिकाणीही ट्रू – जेट सेवा सुरु करणार आहे.
म्हैसूर येथे हे विमान केवळ २० मिनिटांच्या अवधीनंतर लगेच चेन्नईसाठी पुन्हा रवाना होणार आहे.