Saturday, April 27, 2024

/

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

 belgaum

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक बंद केली होती त्यामुळे हा बंद यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र सकाळी 9 वाजता पोलिसांनी बंदोबस्तात बस सेवा सुरू केली आहे दरम्यान परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बस सेवा सुरू राहतील असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान सकाळच्या सत्रात बस सेवा बंद केल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली होती. शेतकरी सुवर्ण विधानसौध कडे धाव घेणार आहेत तेथे आपल्या समस्या मांडून शेतकऱ्यांवर अन्याय कारक असलेल्या भूसुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा रद्द करावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन करणार आहेत. कन्नड साहित्य भवन येथे विविध संघटनांची बैठक घेऊन या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.

विधान सौध पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या शेतकरी विरोधक कायदा हा धोक्याचा ठरत असून तो रद्द करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण कर्नाटकात बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात बेळगाव येथे बस सेवा बंद करून आपल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती.Bus service

 belgaum

सोमवारी होणाऱ्या पुरवणी परीक्षाही रद्द करण्यात आले आहेत. या पुढे ढकलण्यात आली असून त्यांचा शेवटचा पेपर होता. याच बरोबर कृषी संबंधीचे कायदे शेतकऱ्यांना हिताचे ठरतील या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणीही या वेळी करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात बससेवा बंद करून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर पोलिसानी जोरदार बंदोबस्त ठेवून बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून बस सेवा सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांमधील नाराजी दिसून आली. काही प्रवाशांनी वादही घातला तर रिक्षाचालकांनी या आंदोलनाला सहकार्य केल्याचे दिसून आले. बेळगावात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.