बेळगाव आणि धारवाड-हुबळी महानगरपालिका निवडणुका बहुतेक डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे,
आरक्षणासंबंधी हायकोर्टात खटला सुरु असून याची सुनावणी मार्च महिन्यात होणार होती. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर खटल्याच्या सुनावणीला विलंब झाला. यासंदर्भात पुढील महिन्यात अंतिम सुनावणी होणार असून त्यानंतर वरील दोन महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
कोर्टाचा आदेश येताक्षणीच सरकार निवडणुकांच्या तयारीला लागणार असून नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समजते.
पुढील महिन्याच्या सुनावणी नंतर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बेळगाव आणि धारवाड-हुबळीच्या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत.