दररोज कोणत न कोणतं स्मार्ट सिटीच्या सुमार कामाचा नमुना समोर येतंच आहे अश्या वेळी फोर्ट रोड मशिदी जवळील रस्त्याच्या मधोमध पडलेलं धोकादायक व्होल चारी बाजूनी बॅरिकेटस लावण्यात आले आहे.
काल शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्यावर पडलेलं व्होल जगासमोर दाखवून स्मार्ट सिटी बेळगावच्या कामांची पोल खोल झाली होती अनेकांनी शहराचं चाललेलं भकास कामावर टीका केली होती याची दखल घेत प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी या खळग्याच्या चारी बाजूनी बॅरिकेटस लावले होते.
बेळगाव शहरात विकासकामासाठी करण्यात आलेल्या खुदाईमुळे अनेकजण जखमी झालेत अपघात एक दोन जणांचे बळी देखील गेले आहेत याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत मात्र कोणतीही अनुचित घटना घडण्या अगोदर कामांची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या चार वर्षा पासून शहर परिसरात स्मार्ट सिटीची होता पूर्ण व्हायला तयार नाहीत ती रेंगाळत आहेत फोर्ट रोड सारख्या मोठ्या रस्त्यावर मोठा खळगा पडणे तेही या रस्त्याचे काम पूर्ण होऊन केवळ दोनच वर्ष झाली असतील तर अशी अवस्था आहे त्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे
ही पहा काल बेळगाव live ने
स्मार्ट सिटी : बडा घर पोकळ वासा!