आई होणे हा अनुभव सुखद असला तरी या वेळेतून मातेची सुटका होणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच! मग ही बाब मानवाची असो किंवा जनावराची!
आज केळकर बाग येथील एका गायीबाबतीत असाच प्रसंग झाला. केळकर बाग येथील श्री दत्त मंदिराशेजारी एक विद्युत खांबालगत गर्भवती गायीला अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या.
प्रसूती सुखरूप व्हावी यासाठी गायीला औषधही देण्यात आले. मात्र या औषधाची ऍलर्जी झाल्यामुळे ही गाय पिसाळल्याप्रमाणे वागू लागली. जवळच असलेल्या विद्युत खांबाचा तिला स्पर्श होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु ही गाय आटोक्यात येण्यासारख्या परिस्थिती नव्हती. बघ्यांची गर्दी झाली.
आणि त्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या पशुविभागाला याची माहिती दिली. श्रीराम सेना हिंदुस्थानचे गोरक्षक बळवंत शिंदोळकर यांच्यासह मनपा कर्मचाऱ्यांनी मिळून या गायीला सुखरूप पशु रुग्णालयात दाखल केले.