बेळगावच्या किल्ला वीज वितरण केंद्रात तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत खालील भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
फोर्ट रोड, भाजी मार्केट, किल्ला, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, कलमठ रोड येथील वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
शेट्टी गल्ली व्याप्तीतील सेंट्रल बस स्टॅन्ड, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल, फॉरेस्ट ऑफिस, कोतवाल गल्ली, डीसीसी बँक, खडे बाजार, शीतल हॉटेलच्या परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे खडेबाजार, माळी गल्ली, भेंडी बाजार, पांगुळ गल्ली, कलईगार गल्ली, तरुण भारत प्रेस, गवळी गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली येथेही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच आझाद नगर परिसरातील दीपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट मार्ग, धारवाड रोड, उज्वल नगर, गांधी नगर, अमन नगर, एनपी मोटर्स परिसर, मारुती नगर, बसवणं कुडची, देवराज अरस कॉलनी आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे हेस्कॉमच्या वतीने कळविण्यात आले आहे.
“या” भागातील पाणीपुरवठा होणार खंडित
हिडकल जलाशयातील मुख्य पाइपलाइनमधील गळतीच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी बेळगाव शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागाच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
हिडकल जलाशयातील मुख्य पाइपलाइनची आपत्कालीन दुरुस्ती करण्यासाठी हे कामकाज हाती घेण्यात आले आहे. यामुळे जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.