आण्णासाहेब विकास महामंडळाच्यावतीने मराठा समाजातील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना उत्तेजन देण्यासाठी १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या योजनेचा लाभ आता सीमाभागातील युवकांनाही होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना पात्र पाठविण्यात आले आहे.बेळगाव मराठा मोर्चाचे समन्वयक गुणवंत पाटील पत्र देऊन पाठपुरावा करत ही मागणी केली आहे.
कै. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी लढा दिला. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठीही लढा दिला. सीमाभागातील मराठा समाजासाठी त्यांच्या अखंडितपणे लढा सुरु होता.अण्णासाहेब पाटील यांनी आपले अखंड जीवन हे मराठा समाजासाठी घालवले.
कै. अण्णासाहेब पाटील यांचे वारसदार या नात्याने सीमाभागातील मराठा समाजातील युवकांना उत्तेजन मिळावे यासाठी महामंडळाच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. या विकास महामंडळाच्या माध्यमातून सीमाभागातील मराठा समाजातील युवकांना फायदा झाला पाहिजे, या भावनेतून हा अर्ज करण्यात आला आहे.
सीमाभाग हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र सीमाभागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आण्णासाहेब पाटील यांचे वारसदार आणि महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मराठा समाजाच्या दृष्टीने नरेंद्र पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
यांच्या माध्यमातून येथील युवकांना न्याय मिळावा, आणि या योजनेत सीमाभागातील युवकांना सामील करून घ्यावे, यासाठी हे निवेदन पत्राद्वारे देण्यात आले आहे. गरजुनी गुणवंत पाटील यांना संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.