बेळगाव सह सीमाभागातील भाषिक अल्पसंख्याक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी किल्ला येथील वेस्टर्न झोन भाषिक अल्पसंख्याक कार्यालय हे चेन्नई येथे स्थलांतर करू नये अशी मागणी भाजप राज्य ओबीसी सचिव किरण जाधव यांनी केली आहे.
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रहलाद जोशी आणि रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांना पत्र देऊन त्यांनी ही मागणी केली आहे.
सोमवारी सकाळी किल्ला येथील भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयात जाऊन त्यांनीं निवेदन देत सदर मागणी केली आहे.
बेळगाव किल्ला येथील कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेत आहे
सदर कार्यालय स्थलांतरित न करता बेळगाव येथेच राहावे म्हणून कर्नाटक राज्य ओ.बी.सी. मोर्चा कार्यदर्शी किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसाहित कार्यालयाला भेट देऊन सध्य परिस्थितीची पहाणी करून माहिती घेतली.
सदर कार्यालय स्थलांतरित होऊ नये म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी व कर्नाटक राज्याचे दिल्ली विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे आणि विषयी कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. ह्या संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नखवी यांना देखील ह्या विषयी कागदोपत्री पाठपुरावा करण्यात आला आहे अशी माहिती किरण जाधव यांनी दिली.
ओ.बी.सी. महानगर चे अध्यक्ष विजय कदम, नितीन सलगार, महेश खटावकर, भाऊ मुसळे, जयंत भालेकर, सतीश लोकळे, आदित्य जोशी, कोमल बुलबुले, शेष जवळकर, अमर कोपर्डे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
ही देखील न्यूज वाचा
भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयात कमतरता कर्मचाऱ्यांची