बेळगाव सारख्या छोट्या शहरात अनेक संधी उपलब्ध होत आहेत, असे मत सेन्सगीझ या कंपनीचे सीईओ अभिषेक लट्ठे यांनी व्यक्त केले आहे. बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिषेक यांची न्यूज बीबीसी वर्ल्ड या वहिनीवर प्रसारित झाली आहे.
कमीतकमी ऑपरेटिंग कॉस्टसह प्रतिभावंत कामगारांसाठी सेन्सगीझ या कंपनीच्यावतीने दारे उघडी करण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक कामगारांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. याकाळात आपला रोजगार गमावलेल्यांसाठी सेन्सगीझ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून स्थानिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अभिषेक लठ्ठे यांनी दिली.
सेन्सगीझ हि कंपनी उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रात विविध गोष्टी उत्पादन करते. या माध्यमातून बेळगावमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी असे मत त्यांनी व्यक्त केले.