कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात असलेले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एकेकाळी काँग्रेस मध्ये असताना शहरातील काँग्रेस पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते.
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून नूतन काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात काँग्रेसचे अधिवेशन भरलं होते.
महात्मा गांधीजी यांनी काँग्रेसचे अधिवेशन घेतलेल्या बेळगावात काँग्रेस पक्षाला स्वतःचे कार्यालय नव्हते अश्या वेळी तत्कालीन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंत्री असतेवेळी मनपा मधून आर टी ओ सर्कल जवळील जागा काँग्रेस कार्यालयासाठी मंजूर करून घेतली होती त्यावेळी जिल्हा काँग्रेस असलेल्या हेब्बाळकर यांनी ती जागा खरेदी करून घेतली होती आणि सध्याचे विद्यमान पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी यासाठी पैसे खर्च केले होते. याच आर टी ओ सर्कल जवळील नूतन काँग्रेस ऑफिसचे उदघाटन 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
माजी मंत्री सतीश जारकीहोळी हे के पी सी सी कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या काळात या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.गांधीजींनी अधिवेशन घेतलेल्या भूमीत काँग्रेस पक्षाला स्वतःचे कार्यालय उपलब्ध होत आहे.
2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के पी सी सी अध्यक्ष डी के शिवकुमार, एस आर पाटील आदी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे.