दोन दिवसापूर्वी गांधीनगर पुलावर मोटर सायकल वरून जाताना माझ्या गळ्यात अडकवून जखमी झालेल्या युवकाने माळ मारुती पोलीस स्थानकात मांजा विक्री करणार्यावर कारवाई करावी अशी तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त के त्यागराजन यांनी मांजा विक्री करणार्यावर कारवाई करावी असा आदेश दिला आहे.
त्यामुळे यापुढे मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार यात शंका नाही. गेल्या वर्षीही माझ्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेला होता. दहाहून अधिक जण जखमी झाले होते. आता या वर्षीही मांजामुळे दोघे तिघे जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये राहुल ज्योतिबा राजगोळकर वय 30 राहणार महाद्वार रोड हा युवक गंभीर जखमी झाला होता.
गळ्यात दुखापत झाली असून त्यांनी खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले आहेत. रविवारी यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. आता पोलिस आयुक्तांनी मांजा विक्री करणार्यावर कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मांजा विकणाऱ्यांचे आता गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. खास करून गांधीनगर कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरात मागील वर्षी या घटना घडल्या होत्या.
आता गांधीनगरमध्ये दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे मांजा विक्री करणार्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सध्या शाळा कॉलेज सुट्टी असल्यामुळे पतंग उडवण्याचा हंगाम सुरू आहे. मुले तरुण पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत.
मात्र हा आनंद अनेकांना जीवघेणा ठरू लागला आहे. त्यामुळे याकडे आता पालकांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. यापुढे कोणीही मांजा विक्री केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त के त्यागराजन यांनी दिला आहे.