सतत तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बेळगाव खानापूर राष्ट्रीय महामार्ग 4 अ रविवारी सायंकाळी पाणी आले होते.मारुती मंदिर ते पिरनवाडी क्रॉस पर्यन्त रस्त्यावर चार फूट साचलेल्या पाण्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
आजू बाजुच्या अनेक घरातून पाणी शिरत होते अश्या परिस्थितीत उद्यमबाग सीपीआय दयानंद शेगुनशी यांनी कोणत्याही मनपा किंवा इतर सरकारी यंत्रणेची वाट बघताआपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली आणि जे सी बी बोलावून हायवेचे दुभाजक फोडून रस्त्यावर साचलेले पाणी काढले कार्यतत्परता दाखवली आहे.
पिरनवाडी उद्यमबाग भागातील लोकांनी हायवेवर चार फूट पाणी साचले आहे याची कल्पना देताच उध्यमबाग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्ग 4 अ दुभाजक फोडला व पाण्याचा निचरा केला त्यामुळे या भागात होणारा पुढील अनर्थ टळला. रात्रीच्या अंधारात ये जा करणाऱ्या वाहनांना सोपे झाले पावसाने हैराण केलेल्या या भागातील लोकांना दिलासा मिळाला.
रविवारी सायंकाळी सहा वाजल्या पासून रात्री दहा वाजेपर्यंत उद्यमबाग पोलीस निरीक्षक दयानंद यांनी स्वता थांबून रस्त्यावरील अडथळे दूर केले. पोलीस अधिकारी बंदोबस्त किंवा गुन्ह्याचा शोधचं घेत नाहीत तर गरज पडेल तेंव्हा नैसर्गिक आपत्ती काळात जातीने उभे राहून खिंड लढवतात त्यामुळे ते कौतुकास आदरास पात्र ठरतात.
लॉक डाऊन काळात देखील उद्यमबाग चार्ली यांनी कोरोना वारीयर्स भूमिका बजावली होती चांगला बंदोबस्त लावला होता त्यावेळीही त्यांचे कौतुक झाले होते रविवारी रात्री हायवेवरचे साचलेले पाणी काढून त्यांनी पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवली आहे.
हायवेचे दुभाजक फोडून रस्त्यावरचे काढले पाणी'-उद्यमबाग चार्ली इज ऍक्टिव्ह -बेळगाव खानापूर रोडवर रात्री नेमकं काय झालं…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 16, 2020