कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे मंदिर, जोगुळभावी येथील सत्तेमादेवी आणि रायबाग येथील चिंचली मायक्का देवी मंदिर बंद राहणार आहे. भक्तांना 31 ऑगष्ट पर्यंत भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आणखी काही दिवस भक्तांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी नुकताच आदेश बजावला आहे. सौंदत्ती यल्लमा देवीच्या, मायक्का देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याबरोबरच अन्य राज्यातून भक्त येत असतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत भक्तांना या तीन मंदिरात देवीचे दर्शन घेता येणार नाही.
केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून सौंदत्ती यल्लमा, जोगुळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का देवीच्या दर्शनाला हजारो भाविक दररोज येत असतात.
बाहेरून येणाऱ्या भक्तामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने 31 ऑगस्ट पर्यंत बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा, जोगुळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र मंदिरातील पूजा अर्चा नियमितपणे सुरू आहे .