खड्ड्याचा दणका वाहनाला असा बसला की वाहनाचे दोन झाल्याची घटना बेळगाव शहरातील ओल्ड पी बी रोड येथे घडली.सध्या शहरात सगळीकडे स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.शहर भकास दिसत आहे त्यातच पावसाने रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की अनेक लहान मोठे अपघात होत आहेत.
ओल्ड पी बी रोड लेंडी नाल्याजवळ दीड दोन फूट खोलीचे असंख्य खड्डे पडले आहेत माणसाच्या कंबरड्या बरोबर वाहनांचे देखील कंबरडे मोडत आहेत.असाच एक अपघात शनिवारी दुपारी घडला.
मालवाहू चार चाकी टमटम रिक्षा खड्ड्यात गेल्या फाटा तुटून सरळ वाहनाचे दोन भाग झाले होते. यावेळी अपघात स्थळी ये जा करणाऱ्या कडून स्मार्ट सिटीची किल्ली उडवली जात होती.
बेळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पहात शहरावर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे एकीकडे आरोग्य खाते मनपा आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कोविड मध्ये व्यस्त झाल्याने शासनाची अवस्था लकवा मारल्या प्रमाणे झाली आहे.
त्यातच गणेश उत्सव मंडळ सार्वजनिक गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा आग्रह धरत आहेत. स्वच्छता कर्मचारीही कोरोना बाधीत होत आहेत त्यांचा कोविड पोजिटिव्ह चा आकडा वाढल्यास अश्या परिस्थितीत जर कचरा उचल झाली नाही तर रोग राईचे स्वरूप फैलावून महामारी वाढण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.व्हेंटिलेटरच्या अभावामुळे डॉक्टरांच्या कमतरतेमुळे खाजगी दवाखाने बंद असल्याने अनेकांचे जीव जात आहेत अश्या परिस्थितीत सार्वजनिक गणेश मंडळांनी संयम पाळून व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.