बेळगाव-धारवाड आणि शिमोगा-राणेबेंनुर प्रकल्प पुढील रेल्वे अर्थसंकल्पात लवकरात लवकर राबविण्यात येतील, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
शनिवारी शिमोगा मुख्य रेल्वे स्थानक, अरसाला स्थानकातील पायाभूत सुविधा, स्टेशन बिल्डिंग आणि विस्तारीत रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा उदघाटन सोहळ्याला ऑनलाईन चालना देण्यात आली.
शिमोगा-राणेबेनूर नवीन रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी 994 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी
मोफत जमीन उपलब्ध करुन देण्यासहीत प्रकल्प खर्चाच्या .५० टक्के हिस्सा राज्य सरकार खर्च करेल. दावणगेरे -बंगळुरू दरम्यान डबल लाइन बांधकाम करण्यासाठीही जमीन दिली जाईल. ही जमीन रेल्वे विभागाला दिल्यानंतर ताबडतोब काम सुरू करण्यासाठी विभाग आवश्यक पावले उचलेल, असे अंगडी म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, प्रत्येक शहराला रेल्वे जोडणी करण्यासाठी रेल्वे विभाग उत्सुक आहे. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. शिमोगाचे खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्या विनंतीवरून विविध मागण्यांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामध्ये शिमोगा येथे रेल्वे कोच कारखाना उभारणीचाही प्रस्ताव मांडण्यात येईल. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना कोविडमुळे नुकसान झाल्यास कोरोना वॉरियर्सप्रमाणेच सेवा-सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना खासदार बी.वाय. वाय राघवेंद्र यांनी, शिमोगा जिल्ह्यात रेल्वे सेवेचा विस्तार होत असून, स्थानकांवर वाढणारी गाड्यांची संख्या लक्षात घेता इतर पायाभूत सुविधा पुरविण्याची विनंती केली. या समारंभाला शिमोगा जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.
बेळगाव आणि शिमोगा राणीबेन्नूर या नव्या रेल्वे मार्गांना लवकरात लवकर रेल्वे बजेट मध्ये करणार प्रावधान – रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांची माहिती
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 8, 2020