पिरनवाडी येथे स्वातंत्र्य सैनिक संगोळ्ळी रायन्ना यांचा पुतळ्याचा वाद केवळ बेळगाव पुरता मर्यादित राहिला नसून तो राज्यस्तरीय मुद्दा बनला आहे कारण माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी या पुतळ्या बाबत वक्तव्ये केली आहेत.
जिल्ह्यातील विविध भागातील रायन्ना समर्थकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत गावच्या वेशीवर रायन्ना यांचा पुतळा बसावा अशी मागणी केली. अनेक कानडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मोर्चा काढत रायन्ना यांच्या पुतळ्याची मागणी केली.
पिरनवाडी गावच्या वेशीवर रायन्ना यांचा पुतळा बसवा अशी मागणी अनेक वर्षा पासून करत आहेत त्या गावच्या वेशीच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव आहे यासह नोंद गुगल आणि ग्राम पंचायतीत देखील आहे त्यामुळे या चौकाबद्दल वाद होत आहे अलीकडच्या काही वर्षात रायन्ना यांच्या पुतळ्याची मागी होत आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कित्येक वर्षा पासून आहे अशी भूमिका मराठा युवकांनी घेतली आहे.
पिरनवाडी येथील ग्रामस्थांचा कानोसा घेतलं असता या चौकात रायन्ना यांचा पुतळा बसवण्यास काहीच विरोध नव्हता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या ठिकाणी रायन्ना यांची प्रतिमा बसवून चौकाचे नामकरण करत महाराजांचे महत्व कमी करण्यासाठी अट्टाहास करत आहेत याला विरोध आहे असं मत व्यक्त होत आहे. सोमवारी सर्वपक्षीय मराठी भाषिकांची बैठक होणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळी रायन्ना हे दोघेही वंदनीय व्यक्तिमत्व आहे दोन्ही महापुरुषांचे कार्य वेगवेगळ्या पातळीवर महत्वाचे आहे एकट्याने लोकांचा राज्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले तर दुसऱ्याने स्वातंत्र्य लढाईत योगदान दिले अश्या दोन्ही देशभक्त लोकांच्या मूर्ती बसवण्या वरून वाद करणे कितपत योग्य आहे?पुतळ्या साठी वाद होत आहेत हि सामाजिक एकतेसाठी शरमेची बाब आहे.
सोशल डिस्टन्सचा फज्जा – रायन्ना समर्थकांनी मोर्चा काढला खरा मात्र डी सी ऑफीस समोर मोर्चात दरम्यान सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. कोरोना महा मेरीच्या काळात याची काळजी घेणे गरजेचे असताना या ठिकाणी रायन्ना समर्थकाना याचे भान राहिले नाही.