पिरनवाडी येथील चौकात देशभक्त संगोळी रायन्ना यांचा पुतळा उभारण्यावरून वाद झाला, आता हा वाद मिटण्यासाठी गणेशोत्सव संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी यामध्ये मध्यस्ती करून गणेशोत्सवानंतर लागणार रायन्ना पुतळ्याचा निकाल हेच स्पष्ट केले आहे.
जारकीहोळी यांनी कुरबर समाजाच्या प्रमुख संघाशी बैठक घेऊन याबद्दल तोडगा काढण्यास पुढाकार घेतला. विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील हे ही यावेळी उपस्थित होते. संगोळी रायन्ना यांचा पुतळा आपण योग्य चर्चेने आणि सन्मानाने बसवू अशी भूमिका त्यांनी यावेळी मंडळी असून कुरबर समाजानेही या भूमिकेचे स्वागतच केले आहे.
याच पार्श्वभूमीवर पिरनवाडी ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्रे लिहून पुतळा बसवण्यास आपला विरोध नाही पण तो खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती जवळ न बसविता गावात अन्यत्र कोठेही बसवावा आम्ही तो सन्मानाने बसविण्यास मदत करू अशी भूमिका जाहीर केली आहे.
ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा आहे ती खासगी जागा आहे. ग्रामपंचायतीच्या परवानगीने आणि रीतसर नोंद करून ती जागा शिव पुतळ्यासाठी उपलब्ध केली आहे. त्याच जागेत रायन्ना यांचा पुतळा बसविणे वादास कारणीभूत ठरू शकते. याचा विचार व्हावा. आमचा विरोध नाही हे लक्षात घ्यावे असेही त्या पत्रांमध्ये म्हटलेले आहे.