मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वाद संपतो न संपतो तोच बेळगाव पिरनवाडी येथे स्वातंत्र्यवीर संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
शनिवारी पहाटे चार च्या दरम्यान पिरनवाडी गावच्या वेशीवर काहीं कडून संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला आहे पोलिसांनी सदर पुतळा जप्त केला आहे त्या नंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिरनवाडी गावच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देखील पंचायत दरबारी नोंद आहे असे असताना काही विशिष्ट संघटनांनी या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक संगोळी रायन्ना यांचा पुतळा रात्रीच्या अंधारात बसवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पहाटे चार वाजता ग्रामीण पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पुतळा ताब्यात घेतला त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार ही करावा लागला होता.
पोलिसांनी पुतळा जप्त केला म्हणून पुतळा बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भल्या पहाटे आंदोलन करत घोषणाबाजी केली होती शनिवारी सकाळी पिरनवाडी येथील गावच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त वाढला आहे.
2018 साली पासून आहे पिरनवाडी तील या चौकाचा वाद