मार्केट हद्दीत अनेक मंडळांनी मंदिरात गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . चव्हाट गल्ली सोबत जालगार गली शेट्टी गल्ली शिवाजी नगर पहिला क्रॉस, पाटील गल्ली,गांधी नगर पांगुळ गल्ली आदी गल्लीतील मंडळांनी निर्णय घेतेले आहेत. अन्य गल्लीतून देखील निर्णय लवकरच होणार आहे.
सोमवारी सायंकाळी मार्केट पोलीस स्थानक हद्दीतील गणेश मंडळांची बैठक झाली या बैठकीत बहुतांश मंडळांनी मंदिरात श्री मूर्ती स्थापित करून उत्सव साधे पणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. या बैठकीत मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि उपनिरीक्षक विठ्ठल यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी शासनाने जो निर्णय जनतेच्या भल्यासाठी घेतला आहे त्यानिर्णयाचे स्वागत करून मंदिरात गणेश उत्सव पूज करून साधे पणाने साजरा करण्याची गरज आहे . मार्केट हद्दीतील ८० टक्के मंडळांनी हा निर्णय घेतला आहे लवकरच उरलेल्या २० टक्के मंडळांनी निर्णय घ्यायचा बाकी आहे. ज्या गल्लीत मंगल कार्यालय मंदिर अथवा सभागृह शाळा नाहीत तश्या मंडळांना दहा बाय पंधरा आकाराचा लहान मंडप घालायला परवानगी द्यावी अशी मागणी केली.
यावेळी गणेश महामंडळाचे अध्यक्ष पंच रणजीत चव्हाण पाटील, मेघन लंगरकांडे,सांज नाईक, संजय पाटील , विशाल तहसीलदार ,राजू हलगेकर, बाबुलाल राजपुरोहित आदी उपस्थित होते.