अनेक दिवसांपासून कर्नाटक हाऊसिंग बोर्ड हा विभाग महानगरपालिकेच्या अखत्यारीत घेऊन पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी कणबर्गी हाऊसिंग बोर्डच्या नागरिकांतर्फे करण्यात येत होती. या मागण्या लक्षात घेऊन आमदार अनिल बेनके यांनी नुकतेच कणबर्गी हौसिंग बोर्डाच्या कामकाजांना सुरुवात केली आहे.
हा परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारीत वर्ग करण्यात आला असून येथील रस्ते, गटारी, उद्याने, झाडे आणि इतर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार आहे. या कामकाजाला आज अनिल बेनाकेंच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
याचप्रमाणे फुलबाग गल्ली येथील शाळांच्या कामकाजही सुरुवात करण्यात आली आहे. या शाळांच्या बांधकामासाठी आणि नूतनीकरणासाठी १७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कन्नड व मराठी माध्यमांच्या शाळा बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामकाजासाठी कार्य करणाऱ्या ठेकेदारांना आणि मजुरांना योग्य पद्धतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत, या कार्याला जनतेनेही सहकार्य करावे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आज दिली.
या भागातील नागरिकांच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीला प्रतिसाद देऊन आमदार अनिल बेन्केनी पुढाकार घेऊन हे कार्य सुरु केल्याबद्दल येथील स्थानिकांच्यावतीने बेनकेंचे आभार मानण्यात आले. आणि निधी मंजूर करून कामकाजाला प्रारंभ करण्यात आल्याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले.