भारतीय भाषा तज्ञ गणेश देवी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस डॉ बिदनआबा नागपूर विद्यापीठाचे डॉ प्रमोद मनुघाटे हे बेळगावातील वेबिनार मध्ये आपले विचार व्यक्त करणार आहेत.
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे गुरुवार दि.20 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय मराठी वेबिनार होणार आहे.यानिमित्ताने वरील भाषा तज्ञ विचार व्यक्त करणार आहेत.
या वेबिनारमद्ये भारतीय भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हे पहिल्या सत्रामध्ये बोलणार आहेत. या नंतरच्यां सत्रात दुपारी 10 वा. मॉरिशसच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे मराठी विभागाचे प्रा.डॉ. बिदनआबा हे कोरोनाने मॉरिशसमध्ये केलेली उलाढाल या विषयावर बोलणार आहेत. तिसर्या सत्रात 12.30 वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे प्रा.प्रमोेद मुनघाटे कोरोना व मराठी भाषा या विषयावर बोलणार आहेत.
कोरोनाने मानवी जीवनात केलेल्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे आकलन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आरपीडीच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक व नॅकचे समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी याचे संयोजन केले आहे.