बेळगावमध्ये कोविड मृत्यूदर वाढत चालल्याने हा मृत्युदर रोखण्यासाठी आणि यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी बेळगावच्या आरोग्य विभागाला आरोग्य मंत्रालयाने सूचना केल्या आहेत. यासाठी कोविड चाचणी वाढविण्यात याव्या तसेच केंद्रीय सल्लासमिती तर्फे देण्यात आलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.
ज्या जिल्ह्यात मृत्युदर हा राष्ट्रीय पातळीवरील उचांकी स्थानावर आहे त्या जिल्ह्यात प्रभावी नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
अधिक मृत्युदर असलेल्या जिल्ह्यांमध्ये चार राज्यातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरत; कर्नाटकातील बेळगाव, बेंगळुरू शहर, कलबुर्गी आणि उडुपी; तामिळनाडूमधील चेन्नई, कांचीपुरम, रानीपेट, थेनी, तिरुवल्लूर, तिरुचिराप्पल्ली, तूतीकोरिन आणि विरुधनगर; तेलंगणामध्ये हैदराबाद व मेदचल मलकाजगिरी अशा १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये उच्च मृत्युदराव्यतिरिक्त १७% प्रकरणे ही दररोज वाढणारी पॉझिटिव्ह प्रकरणं आणि या तुलनात्मक कमी चाचण्या तसेच अधिकाधिक रुग्ण वाढणारी प्रकरणे आढळून आली आहेत.
या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, चार राज्यातील केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिक्षण, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांचा सहभाग होता.