बेळगाव आणि महाराष्ट्रातील कोयना व वाराणसी जलाशयांच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. परिणामी बेळगाव जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जर आणखी दोन-तीन दिवसात पाऊस पडला तर मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस जाऊदे रे बाबा अशीच मागणी सध्या तरी व्यक्त होत आहे.
कृष्णा नदीकाठी परिसरातील वसाहतीतील नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे राजापूर बॅरेजमधील आवक दीड लाख क्युसेकवर पोहोचली असून आज दुपारी कोयना जलाशयातून 50 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येणार आहे.कृष्णा नदीचा प्रवाह दोन लाखांपेक्षा जास्त असल्यास कृष्णा किनाऱ्यावर पूर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी बेळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात.राजपुरा बॅरेजच्या जलाशयांतून होणारा पाणीसाठा, जलाशयांतून सोडलेले पाणी आणि राजापूर बॅरेजमधून पावसाचा सतत प्रवाह अशा ठिकाणी पोहोचला आहे की जेथे सीमेवर पावसाची आवक चिंतेचा विषय बनली आहे.
बेळगाव जिल्हा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही परिस्थिती कशी हाताळतील याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सध्या दोन्ही धरणातून पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येत आहे. त्यामुळे या नदीकाठी परिसरात असणाऱ्या नागरिकांना चिंता लागून राहिली आहे. सध्या पाऊस गेल्यानंतरच पूर परिस्थिती निवारेल अशा साऱ्यांना लागून राहिली आहे.