कोरोना महामारीमुळे सर्व स्थरात आर्थिक चणचण भासू लागले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे अनेक मंडळाने ठरविले आहे. मात्र विजयनगर बेळगाव येथील श्री विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाने यावर्षी वेगळा उपक्रम राबवत अनेकांसमोर आदर्श ठेवण्याचे काम केले आहे.
यावर्षी कुणाकडूनही देणगी स्विकारण्यात येणार नाही असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करून देणगीसाठी कोणालाही त्रास करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल त्यांनी स्वमर्जीने द्यावी असे आवाहन केले आहे.
या मंडळाच्या कार्यक्षेत्रात पाईपलाईन रोड रक्षक कॉलनी डिफेन्स कॉलनी शिवगिरी कॉलनी विजयनगर आधी विभाग येतो. सध्या मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोना महामारी मुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक गरीब मध्यमवर्गीयांना जगणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत देणगी स्वीकारणे चुकीचे ठरणार आहे.
त्यामुळेच यापुढे श्री विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाकडून कोणतीही देणगी स्वीकारली जाणार नाही असे आवाहन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा उपक्रमातून अनेक मंडळांनी राबवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.