कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच स्वतः ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
माझी प्रकृती ठीक आहे, खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे.
येडियुरप्पा हे कोरोनाची बाधा झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.मागील काही दिवसांपूर्वी ते सी एम ऑफिस मधील कर्मचारी पोजिटिव्ह आल्याने क्वांरंटाइन झाले होते त्यांनी कोरोनाची टेस्ट करवून घेतली होती ती पोजिटिव्ह आल्याने ते इस्पितळात दाखल झाले आहेत.