Friday, May 10, 2024

/

कारागृहातील कैद्याचा मृत्यू

 belgaum

खूनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या एका वृद्ध कैद्याचा शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. यामुळे कारागृहात भीती निर्माण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मारुती रागी पाटील वय 77 रा तारीहाळ असे त्या आरोपीचे नाव आहे.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून त्याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने त्याला तीन महिन्याचा पॅरोल मंजूर केला होता. मात्र त्याचा पॅरोलवरुन परत आल्यानंतर मृत्यू झाला आहे.

9 एप्रिल रोजी मारुतीचे पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. 9 जुलै रोजी पॅरोलची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. शनिवारी मारुतीला श्वसनाचा त्रास जाणवल्याने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते .

 belgaum

सिविल हॉस्पिटलकडे हलविताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.