Monday, April 29, 2024

/

मणगुत्ती येथील शिवमूर्ती पुन्हा बसविण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडं

 belgaum

मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रातोरात हटविण्यात आली. त्याचा बेळगावसह संपूर्ण सीमाभागात आणि महाराष्ट्रात निषेध नोंदविण्यात आला. ही मूर्ती त्वरित पुनर्स्थापित करण्यात यावी, यासाठी शिवसेना बेळगाव – सीमाभागच्या वतीने आणि जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या घटनेनंतर तमाम शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच सदर घटनेचे तीव्र पडसादही उमटत आहेत. बेळगावमध्येही शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. हे कृत्य ज्यांनी केले आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

तसेच छत्रपतींची मूर्ती पुन्हा सन्मानपूर्वक स्थापन करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

 belgaum

हे निवेदन सादर करताना  सीमाभागाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी,शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गारले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपतालुकाप्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, दत्त जाधव, वैजनाथ भोगण,सागर पाटील आणि युवा सेनेचे पदाधिकारी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.