मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच पुन्हा शुक्रवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जर पाऊस पुन्हा पडला तर मोठे नुकसान होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पिके पोषक असून पावसाने विश्रांती घ्यावी अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी शुक्रवारपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे.
त्यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नदीकाठ परिसरात असलेले पिकांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक जण दुबार भाताची लागवड करत आहेत. मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर मोठी समस्या निर्माण होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पाऊस नको रे बाबा असेच म्हणण्याची वेळ निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस पाऊस जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्यातरी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांतून चिंता लागून राहिली आहे.