बेळगावात कोरोना बाधित गरोदर महिलेची यशस्वीपणे डिलिव्हरी केल्याबद्दल कोरोना फायटर नर्सचे अभिनंदन वैद्यकीय शिक्षण मंत्री डी सुधाकर यांनी केलं आहे.खानापूर तालुक्यातील हलशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या नर्सचे कौतुक वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलं आहे.
हलशी येथील प्रायमरी हेल्थ सेंटरच्या नर्सने कोरोना पोजिटिव्ह गरोदर महिलेचा विश्वास वाढवत यशस्वीपणे प्रसूती केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे ट्विट करता सुधाकर यांनी त्या नर्सचे अभिनंदन केले आहे त्यामुळे अविरत कार्य करणाऱ्या बेळगावच्या नर्स पुन्हा एकदा प्रकाश झोतात आल्या आहेत.
ಕೋವಿಡ್ ತುರ್ತುಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾ, ಹಲಸಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ದಾಖಲಾದ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಗರ್ಭಿಣಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿ ಹೆರಿಗೆ ಮಾಡಿಸಿದ ಡಾ. ಮಂಜುನಾಥ್ ದಳವಾಯಿ, ನರ್ಸ್, ರಾಣಿ ಲಖನಗೌಡ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ವೈದ್ಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಾರ್ಯ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು pic.twitter.com/kpaYEbx2Id
— Dr Sudhakar K (@mla_sudhakar) August 9, 2020
खानापूर तालुक्यातील हलगा गावची गरोदर कोरोना बाधित महिला प्रसूतीसाठी हलशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी रात्री दाखल झाली होती त्यावेळी डॉक्टर दवाखान्यात नव्हते मात्र या नर्सने स्वता पी पी ई किट परिधान करत नर्स राणी लखनगौडा यांनी डॉक्टर मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रसूती केली.डॉक्टरांचा फोन वरून मार्गदर्शनावाखाली तिने ही डिलिव्हरी केली आहे.
नर्स राणी लखनगौडा यांच्या साहसाचे कौतुक वैधकीय शिक्षण मंत्र्यांनी केलं आहे. एक नर्सने कोरोना काळात डॉक्टरांच्या अनुपस्थितीत यशस्वी प्रसूती केलेल्या गरोदर महिला तिला झालेला मुलगा दोघांचीही प्रकृती ऊत्तम आहे या नर्सच्या कार्याचे कौतुक राज्याच्या वैधकीय क्षेत्रात केलं जातं आहे.