स्वातंत्र्यदिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात कॅटोंमेंट बोर्डाला विविध प्रकारचे सहकार्य केलेल्या दानशूर व्यक्ती आणि कोरोना वारीयर्सचा कॅटोंमेंट बोर्डकडून गौरव करण्यात आला.
लॉकडाऊन काळात कॅटोंमेंट बोर्ड व्याप्तीत राहणाऱ्या गरजू लोकांना मूलभूत गरजू वस्तूंची मदत केल्या बद्दल बेळगाव कॅटोंमेंट बोर्डाने या कोरोना वारीयर्सचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.
कॅटोंमेंट भागात राहणाऱ्या गरिबांना सहकार्य करण्याचे आवाहन बोर्डकडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदत देवू केली होती. त्या सर्व दानशूर व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले.
![Catonment board](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200816-WA0192.jpg)
फोर्ट रोड येथील आटोमोबाईल असोसिएशन, हृदयविकार तज्ञ डॉ. एम.डी. दीक्षित, उद्योजक रोहित आर. देशपांडे, चैतन्य कुलकर्णी, डॉ. सोनाली सरनोबत, गुजराती नवरात्री उत्सव मंडळ, रोट. विक्रम जैन, जय भारत फौंडेशन, शामल धनवार, पै हॉटेलचे संचालक अजय पै, पुष्पक हणमन्नावर, डॉ राहिला शेख, उद्योजक शिवकांत सिदनाळ, जिवनदीप फौंडेशनचे किरण परब, आरएसएस संघटना, किरण निप्पाणीकर, पिंक स्टेपच्या संचालिका मयुरा शिवरकर, शलाका जठार आदींचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी कॅटोंमेंट बोर्डचे सी ई ओ बर्चस्व व सदस्य साजिद शेख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कॅटोंमेंट बोर्डाने प्रोत्साहन म्हणून कोरोना वारीयर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढवला मात्र मनपा कार्यक्षेत्रात कार्य केलेल्या कोविड वारीयर्सचा देखील सन्मान मनपाने करण्याची गरज व्यक्त होत आहे