कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे.
शुक्रवारी बेळगावातील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची कोरोना आणि पूर नियंत्रण बैठक झाली या बैठकी नंतर त्यांनी खाजगी इस्पितळाना इशारा दिला आहे.
बंगळुरू मध्ये शासकीय आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या इस्पितळा विरोधात कारवाई कऱण्यात आली आहेत्याच धर्तीवर बेळगावात कोविड उपचाराच्या नावाखाली अधिक बिल वसूल करणाऱ्यावर कारवाई केली जाईल या विषयात कुणाचीही गय केली जाणार नाही असे त्यांनी नमूद केलं.
मागील बैठकीत जिल्हा इस्पितळात सी सी टी व्ही कॅमेरे बसवा असह्य सूचना केल्या होत्या मात्र अद्याप अधिकाऱ्यांनी त्या सूचनांचे पालन केले नाही याबाबत बिम्स अधिकाऱ्यांना वार्निंग दिली आहे आता लवकरात लवकर बिम्स मध्ये सी सी टी व्ही लावा अश्या सूचना दिल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले
शहरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे कोणत्याही सखल भागात पाणी साचू नये स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत याला जनतेचा नुकसान होऊ नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी ठेकेदाराना याची कल्पना द्या अशी अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.