बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ डॉ. कें. व्ही. राजेंद्र यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती दक्षिण कन्नड(मंगळुरू) जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोलार जिल्हा पंचायत सीईओ एच.व्ही.दर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी कोरोना सुरु झाल्यापासून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. तत्कालीन डी सी बोंमनहळळी यांच्या सोबत कोरोना नियंत्रण करण्यास त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
राजेंद्र के व्ही यांच्या जागी कोलार जिल्हा पंचायत सी ई ओ एच व्ही दर्शन यांची राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असणाऱ्या बेळगाव जिल्हा पंचायत सी ई ओ म्हणून झाली आहे.