बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे.
आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले आहेत हुक्केरी तालुक्यातील एक महिला तर अथणी तालुक्यातील एक महिला अश्या दोन महिला शुक्रवारी दगावल्या आहेत याबाबत जिल्हा आरोग्य खाते अधिकृत माहिती देणे बाकी आहे
बेळगाव जिल्ह्यात एकूण 342 रुग्ण बरे झाले आहेत 9 जण आय सी यु मध्ये उपचार घेत होते
गुरुवारी सापडलेल्या 9 रुग्णां पैकी वंटमुरी येथे 2 पिरनवाडी येथे 1 तर अथणी तालुक्यात 5 व बागलकोट जिल्ह्यातला 1 रुग्ण आहे.