बेळगावात एकिकडे कोरोनाची दशहत वाढत असताना डेंगूची ही दहशत वाढत आहे.रविवारी वडगांव भागात डेंगू मिळे एक बारा वर्षे बालक दगावला आहे.
वरद किरण पाटील वय 12 वर्षे असे या मयत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. डेंग्यू’मुळे उपचाराअभावी त्याचे रविवारी दुपारी 4 वाजता निधन झाले आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार वरद हा के एल एस मध्ये सहावीत शिकत होता विष्णू गल्ली वडगांव येथील दूध व्यावसायिक किरण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता.
आजारी झाल्याने त्याला तीन दिवसा पूर्वी खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने त्याचे निधन झाले आहे.
शहरात अनेक डेंग्यूचा देखील प्रादुर्भाव वाढल्याने मनपा आरोग्य खात्याने लक्ष देण्याची गरज आहे.