ट्रक चालकाचा अंगात सळ्या घुसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.तिनई घाट येथे अपघात झाला. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
शिवानंद पुजार ( रा. कल्लोळ, तालुका गोकाक ) असे त्या ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. बेळगाव गोवा मार्गावरील तिनई घाट येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाल्याची घटना घडली आहे.
ट्रकमध्ये भरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या ट्रकचालकाच्या अंगात घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की गोव्याहून बेळगाव ला जाणारा बारा चाकी ट्रक तेथील खराब रस्ता अरुंद रस्त्यामुळे रस्ता सोडून खाली उतरला. त्यामुळे ट्रक मध्ये असणारे लोखंडी सळ्या चालकाच्या अंगात घुसल्या त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र रस्त्याकडेला हा अपघात घडल्यानंतर कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही.
ट्रक चालक झोपला असावा अशा शंकेने बऱ्याच जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र थोड्या वेळानंतर हा प्रकार समजलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. रामनगर पोलीस उपनिरीक्षक मंजुळा रावजी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यास विलंब लागल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त झाली.
रामनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.