कंग्राळी बी के ग्राम पंचायतीचे नव्या इमारतीचे उदघाटन

0
 belgaum

गावातील विकासकामे चांगली झाली आहेत. ग्रामस्थांचे सहकार्य तसेच लोकप्रतिनिधींच्या  इच्छाशक्तीमुळे, गावाचा विकास झालेला दिसून येत आहे. विकासाची कोणतीही कामे असली तरी लोकप्रतिनिधी गावाच्या पाठीशी ठाम असतील. गावातील सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी सर्व प्रकारचे साह्य, सहकार्य देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे आश्वासन यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष तसेच आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिले.

ते बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बीके ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

bg

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी के ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ पार पडला.

यावेळी सरकारचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ यांनी शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये विकास  कामे होत नसल्याचा आरोप होत आहे. पण  कंग्राळी बीके गावाचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि निर्वाचीत सदस्यांनी  हे खोटे ठरवले आहे. गावाच्या विकासासहित, पंचायतीची नवीन  इमारत बांधण्यात आली आहे,  हे उत्तम कार्य आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा  पंचायत उपाध्यक्ष अरुण  कटांबळे, जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष दत्ता  पाटील, उपाध्यक्ष केसरजहाँ सय्यद, प्रदीप पाटील, कल्लाप्पा जाधव, जयराम  पाटील, आणि इतर  उपस्थित होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.